अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच भाऊसाहेब कुलकर्णी यांना मिळाले 6 लाखांचे पॅकेज.
मार्क्वार्ड इंडिया प्रा. लि. या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयातील भाऊसाहेब कुलकर्णी विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
मार्क्वार्ड इंडिया प्रा. लि. ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आहे. या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन विभागातील भाऊसाहेब कुलकर्णी या विद्यार्थ्याची निवड करण्यात असून त्यांना वार्षिक 6 लाखांचे पॅकेज मिळाले आहे..
विशेष महत्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंर लगेच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थ्यानी आवर्जून संगितले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन चे विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…