ज्येष्ठ नागरिकांचा आपण आदर करतो. ज्येष्ठ नागरीक म्हणजे समाजाला दिशा देणारे गुरुच. त्यांना आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले असतात.
त्याच अनुभवाच्या आधारावर समाजात एक पिढी घडते. त्यामुळे ज्येष्ठांचा आपण नेहमी सन्मान करतो. पण औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सन्माला तडा जाईल अशी धक्कादायक आणि प्रचंड विचित्र घटना घडली आहे. एका सराईत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत आधी लुटलं.
त्यानंतर त्याने वृद्धेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलिसांवरही चाकू हल्ला केला. पण पोलीस त्यातून सुखरुप बचावले. संबंधित घटना ही औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात घडली आहे.
आरोपीने वृद्धेला आधी चाकूचा धाक दाखवला. त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. चाकूचा धाक दाखवत त्याने वृद्धेकडे पैसे आणि दागिने लुटले. त्यानंतर आरोपीने वृद्धेसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केलं.
आरोपीने विकृतीचा कळस गाठत वृद्ध महिलेवर बलात्कार केला. आरोपीच्या या कृत्यामुळे वृद्ध महिला मनातून खचली आहे. संबंधित घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलिसांवर थेट चाकू हल्ला केला. यावेळी पोलीस आणि आरोपी यांच्यात चांगलीच धक्काबुक्की झाली. अखेर आरोपीच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं.
शक्तुर लष्करी भोसले असे आरोपीचे नाव आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधाच विविध कलमांतर्गत 7 गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. दुसरीकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…