ताज्याघडामोडी

प्रा.सुभाषराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी भव्य नागरी सत्कार

ईश्वर वठार येथील विविध विकास कामांचा लोकार्पन सोहळ्याचेही आयोजन

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील प्रा. सुभाषराव माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ईश्वर वठार या गावी भव्य नागरी सत्कार व ईश्वर वठार येथील विविध विकास कामाचा लोकार्पन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि ४/१०/२०२२ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाचे प्रमुख व सत्कारमूर्ती मा.आ.प्रशांतराव परिचारक चेअरमन पांडुरंग सह साखर कारखाना श्रीपूर व कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.बबन दादा शिंदे चेअरमन- विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखाना ,माढा हे आहेत .
कै.सुधाकरपंत परिचारक, मा.आ.प्रशांतराव परिचारक,चेअरमन उमेश मालक परिचारक यांच्या बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून खांद्याला खांदा लावून काम करत आहेत .प्रा.सुभाषराव माने यांने हे सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून काम करत आहे त्याचबरोबर त्यांना सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य आहेत सोलापूर जिल्हा नव्हे तर ते महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांसाठी त्यांनी अनुदान मिळण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष शासन दरबारी जन आंदोलन केले वेळोवेळी शासनाला सुध्दा त्यांच्या संघर्षाची दखल घ्यावी लागली .प्रा. सुभाषराव माने हे सर्व सामान्य कुटुंबातील एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायाचे .विनाअनुदानित शिक्षकांचा वनवास कधी संपनार म्हणून त्यांनी अनेक आदोलने यशस्वी केले. त्यातच काही प्रमाणात थोड्याफार शाळांना अनुदान ही आले.
प्रा. सुभाषराव माने हे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे .तसेच महाराष्ट्र राज्यांच्या मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी काम केले आहे.
ईश्वर वठार या त्यांच्या गावात गेली पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत, सोसायटी या मध्ये त्यांची एकहाती सत्ता आहे .गावातील तरूण व्यसनाधीन होऊ नये म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले तरूणांच्या हाताला काम मिळावे म्हणून कायम प्रयत्न करीत असताना गावातील अनेक तरूणांच्या हाताला त्यांनी अनेक माध्यमातून काम दिले.यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून दिनकर मोरे व्हा चेअरमन पांडुरंग सह साखर कारखाना,चेअरमन उमेश मालक परिचारक, अॅड वामनराव माने सर,दाजी भुसनर मा.सभापती,वसंतनाना देशमुख जि.प.सदस्य,दिलीप आप्पा घाडगे सभापती,कैलास खुळे,दिलीप चव्हाण, हरिष गायकवाड, तानाजी वाघमोडे,बाळासाहेब देशमुख, दिनकर नाईकनवरे,प्रशांत देशमुख, सौ.अर्चना व्हरगर,सौ.राजश्री भोसले,बाळासाहेब माजी,विवेक कचरे,बाळासाहेब यलमार, हणमंत कदम,भास्कर कसगावडे,भैरू माळी,गंगाराम विभुते,सुदाम मोरे,ज्ञानदेव ढोबळे,किसनराव सरवदे,भगवानराव चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हनुमान मैदान ग्रामपंचायत कार्यालय समोर ईश्वर वठार येथे आयोजित करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago