शिवसेना शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपार करून आपला एन्काऊंटर करण्याची धमकी देत परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा घाट शिंदे गट पोलिसांच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्यास पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार संदीप नाईक व विजय चौगुले हे जबाबदार राहतील, असं एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यावेळी खासदार राजन विचारे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची त्वरित बदली न केल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा एम.के. मढवी यांनी दिला आहे.
पोलीस उपायुक्तांचं काय आहे म्हणणं?
एम.के.मढवी यांच्यावर अनेक जुने गुन्हे दाखल असतानाच त्यांच्यावर यावर्षी देखील तीन अन्य गुन्हे दाखल झाले असल्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे आपल्यावर तडीपारीची कारवाई होईल या भीतीने ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…