सावत्र आईने केलेल्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथे घडली. डोंबिवलीत घडलेल्या एका घटनेमुळे शहर हादरून गेले आहे.
मारहाणीमुळे झालेल्या जखमांमुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावत्र आईला पोलिसांनी अटक केली आहे.चिमुकल्याला मारहाण करणाऱ्या निर्दयी महिलेचं नाव अंतिमादेवी असे आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अंतिमा देवी विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. अंतिमादेवी कायमच सावत्र मुलांना मारहाण करत असे.
डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात संजय जयस्वाल हे पत्नी अंतिमादेवी व आपल्या मुलांसह राहतात. अंतिमा ही त्यांची दुसरी पत्नी असून मुलगा कार्तिक हा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. चहा विक्रीचा व्यवसाय करत संजय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.अंतिमादेवी ही नेहमी सावत्र मुलगा कार्तिक आणि त्याच्या भावाला मारहाण करायची. काल दुपारी तीनच्या सुमारास किरकोळ कारणावरून तीने साडेतीन वर्षाच्या कार्तिकला लाथा बुक्क्यांनी आणि वायरने बेदम मारहाण केली. या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला.
बेशुद्ध झाल्यानंतर कार्तिकला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु कार्तिकची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात कार्तिकला अमानुषपणे मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अंतिमादेवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक नगर पोलिसांनी अंतिमादेवीला अटक केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…