राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विभागाचा कारभार बदलणार असून रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद-वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर, प्रदीप व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकासपदी बदली केली आहे.
संजय खंदारे यांची बदली प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभागात झाली असून अश्विनी जोशी यांना सचिव वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालय, निलेश गटने यांना चिफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर एसआरए-पुणे येथे बदली देण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर यांना प्रधान सचिव विमान चलन आणि राज्य उत्पादन शुल्क, अनुप कुमार यांना अल्पसंख्यांक सचिव, ए. आर. काळे यांच्याकडे अन्न प्रशासन आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे.
हर्षदीप कांबळे प्रधान सचिव उद्योग, ऊर्जा कामगार, लीना बनसोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास-ठाणे हा पदभार असणार आहे. कौस्तुभ दिवेगावकर हे प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामविकास-पुणे, तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दराडे पर्यावरण विभागात सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…