ताज्याघडामोडी

‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट

‘विठ्ठल’च्या जमिनीत एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव सादर

पंढरपूर तालुक्यता एमआयडीसी झाली पाहिजे अशी मागणी गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने होत आली.पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे ३५ वर्षांपूर्वी एमआयडीसी उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला प्रशासकीय पातळीवर थोड्याफार हालचाली झाल्या पण पुन्हा ब्रेक लागला.यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी नाही या बद्दल येथील तरुण पिढीकडून विशेत; सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून संताप व्यक्त करण्यात आला,दर नोकरी साठी पुण्या मुंबई सारख्या महानगराकडे धाव घेतलेल्या या शहर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या माता -पित्याकडून खंत व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले.
२०१२-१३ मध्ये स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठीच्या जागेचा शोध घेण्यासाठी उद्योग मंत्रालयाचे श्री कोमल हे अधिकारी सहकाऱ्यासह आले आणि धोंडेवाडी,मेंढापुर येथील जागेची पाहणी करून परत गेले.
      तर मागील दोन महिन्यापासून राज्यात सत्तांतर होताच पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे यासाठी जोरदार पाठपुरावा सुरु केला.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बैठकही झाली आणि पंढरपूर एमआयडीसी साठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एक पथकही पंढरपूर तालुक्यात आले.कोर्टी,कासेगाव-बोहाळी आणि रांझणी परिसरातील जागेची पाहणीही केली पण या परिसरातील शेतकऱ्यांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला.मागील काही वर्षांपासून कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधीकारी कासेगावच्या शेतकऱ्यांना घेऊन विरोध करू लागले.त्यामुळे जागेअभावी पुन्हा पंढरपूर एमआयडीसी रखडणार अशी चिंता सतावू लागली.
    मात्र २६ सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचा वार्षिक सर्वसाधारण सभेत विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या सभासदांसमोर चेअरमन अभिजित पाटील यांनी एक प्रस्ताव मांडला.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे अतिरिक्त असलेली २५० एकर जमीन एमआयडीसी साठी भाडेतत्वावर देण्याचा.त्याच बरोबर या जागेभोवतीचे अनेक शेतकरी एमआयडीसी साठी जमीन देण्यास तयार असल्याचे देखील चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.आणि सभासदांनी या ठरावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.
     आज गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत उद्योगांना आवश्यक असणाऱ्या वीज, रस्ते आणि पाणी ३ या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आधीपासून उपलब्ध असल्याने उद्योगांसाठी आणि सरकारसाठी या ठिकाणी “एम.आय.डी.सी.” उभारणी करणे सोयीचे आहे हे नामदार उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे,सोलापूर संपर्क प्रमुख महेश साठे आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

5 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

5 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago