महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने अनेक वेळा अत्याचार केले.
त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असुन अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापुर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र वसंत भोईर असं पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. २०१८ पासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. एप्रिल २०२२ रोजी प्रियकराने स्वतःच्या कार मध्ये बसवून पीडितेला फिरण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित भयभीत होऊन रडत असतानाच प्रियकराने तिची समजूत काढत लग्नाचे आमिष दाखवून वेळ मारून नेली.
त्यानंतर पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून मे २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यत वारंवार तिच्यावर अत्याचार केले. मात्र त्यानंतर आरोपी महेंद्र याने पीडितेशी बोलणे बंद करून तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. त्यामुळे व्यथित झालेल्या पीडित तरुणीने गुगलवर विष विक्री करणाऱ्या कंपनीचे नाव सर्च करून त्या कंपनीकडून ऑनलाईन ५० ग्राम विषारी औषध मागवलं. ते विष ती पर्समध्येच घेऊन फिरायची.
दरम्यान २४ सप्टेंबर रोजी पुन्हा आरोपी महेंद्र याने कारमध्ये बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. त्याचवेळी पीडितेने पर्समध्ये असलेले विष कारमध्येच प्राशन केले. घाबरलेल्या आरोपी महेंद्र याने पीडितेला तातडीने कारमधून घरी सोडले.
अखेर तरुणीची प्रकृती खालावतच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बदलापूर पोलिसांनी आरोपी महेंद्र भोईर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…