चंदिगढ येथील विद्यापीठाच्या वसतिगृहातील एमएमएस प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॅमरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या वॉचमनने सोसायटीत राहणाऱ्याच महिलांचे मध्यरात्री अश्लील अवस्थेत व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटणेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून वॉचमनवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी देवळाली पोलिसांनी आलेल्या तक्रारीवरुण वॉचमनच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॅमरोड दस्तगिर बाबा रोड येथे एका सोसायटीत गेल्या दहा वर्षांपासून नंदलाल टिकाराम डांगी रखवालीचे काम करत आहेत.नंदलाल टिकाराम डांगी हा 28 वर्षाचा असून रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून महिलांचे चित्रीकरण करीत असल्याचे समोर आले.या प्रकरणी पीडित महिला आणि साक्षीदार महिलांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर देवळाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवळाली पोलिसांनी या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करत संशयित आरोपीला अटक केली आहे. आणि त्याचा मोबाईल फोन देखील जमा केला आहे .संशयित आरोपी नंदलाल टिकाराम डांगी याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या पथकाकडून अधिकचा तपास केला जाणार आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…