आंबेगाव येथील भैरवनाथ विद्यालयात शिकणाऱ्या कुणाल विकास कराळे (15 )या इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतीलच दहावीत शिकणाऱ्या मुलाने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
यात मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिक्षक ,विद्यार्थी, व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत मिळालेली माहिती नुसार, जखमी कुणाल कराळे व इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलाची एक महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होता. त्यावेळी शालेय शिक्षकांनी हा वाद मिटवला होता मात्र दहावीतील मुलाने खुन्नस डोक्यात धरून आज कोयता लपवून आणत कुणाल पुढे जात असताना शाळेच्या मैदानातच पाठीमागून कोयत्याने वार केले आहे .
यात कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या बाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती देत जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर अधीक्षक डॉ. दुधवडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.तेजस शिंदे, डॉ.श्वेता डोंगरे, डॉ.आकाश पावरा यांनी उपचार केले आहेत. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे, पो.कॉ, तुकाराम मोरे पुढील तपास करत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…