ताज्याघडामोडी

पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती

कोल्हापुरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या कुटुंबातीलच सदस्याने केल्याने एकच खळबळ उडाली.

कागलमध्ये घडलेल्या या घटनेत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने बायको आणि मुलांचा खून केला आहे. हत्या केल्यानंतर महिलेचा पती स्वतःच पोलिसांत हजर झाला आणि याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे. काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलामध्ये मंगळवारी दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत हा थरकाप उडविणारा घटनाक्रम घडला.

त्यानंतर प्रकाश रात्री नऊच्या दरम्यान स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाला आणि याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं, की प्रकाश शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलामध्ये पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहायचा. मंगळवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मुलं शाळेला गेल्याचं पाहून प्रकाशने पत्नीचा गळा आवळून खून केला.सायंकाळी साडेपाचला मुलगा कृष्णात शाळेतून घरी आला.

कृष्णात दिव्यांग होता. प्रकाशने मुलाचाही दोरीने गळा आवळला आणि खून केला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बाहेर गेलेली मुलगी आदिती घरी परत आली. यावेळी आरोपीने तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रकाशने तिच्या डोक्यात वरवंटा मारला आणि तिचीही हत्या केली. यानंतर तो स्वतः पोलिसांत हजर झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

5 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

5 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago