ताज्याघडामोडी

बुरखा घालण्यास मनाई केल्याने इकबालने केली रुपालीची हत्या!

बुरखा घातला नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. इकबाल अहमद शेख (वय 36), असे आरोपीचे नाव असून तो टॅक्सीचालक होता.

हिंदू तरूणीने 3 वर्षांपूर्वी एका मुस्लिम तरूणाशी विवाह केला होता. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्यामुळे त्यांच्या प्रेमात धर्म आडवा येणार नाही, हे लग्नाच्या वेळीच ठरले होते. मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम पण काळानुसार सगळे काही बदलत गेले. मुलीवर मुस्लिम प्रथा अंगीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र मुलीने या सगळ्याला नकार दिला असता तिची हत्या करण्यात आली. रुपाली असे मृत तरूणीचे नाव असून तिचा पती इक्बाल महमूद शेख याने भरदिवसा तिची हत्या केली. ही घटना मुंबईतील चेंबूर भागातील आहे. पोलिसांनी इक्बालला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

दरम्यान, लग्नानंतर रूपाली ही तिचा पती इक्बालच्या घरी राहायला आली होती. ती हिंदू प्रथांनुसार वावरत होती, मात्र इक्बालच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. सुरुवातीला इक्बाल रुपालीच्या बाजूने होता, पण हळूहळू त्याने रुपालीवर मुस्लिम चालीरीती पाळण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. रुपालीवर बुरखा घालण्याचा दबाव होता, पण तिने नकार दिला. लक्षणीय बाब म्हणजे रूपाली आणि इक्बाल यांना एक मुलगा देखील आहे. 

मुस्लिम चालीरितींमुळे दोघांमधील वाद चिघळत चालला होता. रोजच्या वादामुळे रूपालीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास 6 महिने ती तिच्या पतीपासून वेगळी राहिली. यादरम्यान रूपाली आणि तिचा पती इक्बाल यांच्यात संवाद व्हायचा मात्र मुस्लिम प्रथांमुळे वाद देखील होत होता. सोमवारी इक्बालने रुपालीला चेंबूर येथील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. भेटीनंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. सततच्या वादामुळे रुपालीने इक्बालकडे घटस्फोट मागितला. इक्बालने घटस्फोटास नकार दिला. दरम्यान, बाचाबाची सुरू झाली आणि इक्बालने रूपालीवर चाकून हल्ला केला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago