दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डाॅक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या म्हसरूळ येथील एका हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळ परिसरात 55 वर्षीय पीडित डॉक्टरचे स्वत:चे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर 10 सप्टेंबर रोजी डॉक्टरला भेटले. तिथे डॉक्टरांसोबत दोघांचे वाद झाले. यानंतर प्रियकर निघून गेला, तर पत्नी डॉक्टरांसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली. तिथे डॉक्टरांना तिने भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या पत्नीचे नात्यातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे डॉक्टरला कळले. त्यातून हा वाद झाल्याचे कळते.
घटनेतील तक्रारदार हा डाॅक्टरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. डॉक्टरांचे सध्याच्या संशयित पत्नीशी (45 ) असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्याच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करून घेतली. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात ते पाच-सहा वर्षे कारागृहात शिक्षा भाेगत हाेते. डॉक्टरांना दुसऱ्या पत्नीपासूनही एक अपत्य झाले. मात्र, डॉक्टर कारागृहात गेल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले.
ज्याच्याशी विवाह झाला त्याचाही काही वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापूर्वी डॉक्टर कारागृहातून मुक्त झाल्यावर पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलासह राहू लागले. यानंतर सध्याच्या संशयित पत्नीला कोरोना झाल्याने तिने डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेतले. तेव्हा दोघे पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी रजिस्टर लग्न केल्याचे समाेर येते आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…