पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वडगांव बुद्रुक येथे मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून खून करण्यात आला आहे.
नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (वय १७, रा. जाधव नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
मयत नागेश हा वडगाव बुद्रुक येथील पाऊंजाई मंदिर पाठीमागील घुले नगर परिसरात असणाऱ्या बंटी बबली पॉइंट वर मोकळ्या प्लॉटमध्ये एका मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घातली. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रेम प्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…