दहावीच्या अभ्यासावर अधिक लक्ष दे, असा पालक तगादा लावतात, म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. यामुळे प्रभादेवी परिसरत मोठी खळबळ उडाली आहे.
वरळीच्या सेंच्युरी मिल म्हाडा वसाहती मधील एका इमातीत ती विद्यार्थिनी पालकांसोबत राहत होती. दहावीत असल्याने अभ्यासावर अधिक लक्ष दे, असे पालक तिला शुक्रवारी रात्री म्हणाले होते. पालकांच्या बोलण्यास कंटाळून तिने इमारतीच्या गच्चीवर जाऊन तेथे असलेल्या लोखंडी रॉडला गळफास लावून आपले आयुष्य संपवले आहे.हा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनास्थळावर कुठलीही सुसाईड नोट आढळून आली नाही. ना म जोशी मार्ग पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…