अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राला दारू पाजून त्याचा दुपट्ट्याने गळा आवळून मित्रानेच हत्या केली. चांदूरबाजार लागत बिलालपूर ते सोनेरी मार्गावर एका शेत शिवारात ही घटना घडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
बिलालपूर ते सोनेरी मार्गावर असणाऱ्या सुरेंद्र पात्रे यांच्या शेतात एदिलालपूर येथील रहिवासी संदीप याचा मृतदेह शनिवारी आढळून येताच खळबळ उडाली. प्रथमदर्शनी विष घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र पोलिसांना ही आत्महत्या नाही असा दाट संशय होता. पोलिसांनी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदुरबाजार ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यावेळी त्याची गळा आवळून हत्या झाली असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान पोलिसांनी संदीपचा दिलालपूर येथील मित्र योगेश भाकरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला आपल्या स्टाईलने विचारले असता संदीपच्या पत्नीसोबत असणाऱ्या अनैतिक संबंधाची माहिती त्याला कळल्याने त्याला मुद्दाम दारू पिण्यासाठी बोलावून त्याला कायमचा संपविला असे मान्य केले.
प्रथमदर्शन ही आत्महत्या वाटत असल्यामुळे पोलिसांनी आधी आत्महत्त्येचा गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवाल येताच पोलिसांनी आरोपी योगेश भाकरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांनी स्प्षट केले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…