राज्यातील काही भागांत २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
२६ सप्टेंबर रोजी परभणी, नांदेड, लातूर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या भागासाठी यलो अलर्ट दिला आहे.
२८ सप्टेंबर रोजी देखील मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.गेल्या २४ तासांत राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडला आहे. येत्या २, ३ दिवसांतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबई आणि शहरात शुक्रवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी पुन्हा हजेरी लावली. सकाळी ७ ते ८ या तासाभरात रावळी कॅम्प येथे सर्वाधिक २८ मिमी तरसायन माटुंगा येथे २१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला.मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…