पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे माहिती झाल्याने तो गावाकडून पुण्यात आला. तरीही तिचे प्रेमसंबंध चालूच राहिल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले.पत्नीच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.गणेश मिनीनाथ घुले (वय २४, रा. नेरे दत्तवाडी, मुळ रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्यांची बहीण अनिता मिनीनाथ घुले (वय २५, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९१२/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याचा आश्विनी हिच्या बरोबर ७ जुलै २०२१ रोजी विवाह झाला होता. तो भांड्याचे दुकानात काम करीत होता. एक दोन वर्षे गावात राहिल्यानंतर जुलै २०२२ मध्ये तो आपली पत्नी आश्विनी हिला घेऊन आई वडिलांना काही एक न सांगता गावातून निघून पुण्यात राहण्यास गेला. फिर्यादी यांनी भावाला विचारल्यावर त्याने आपल्या पत्नीचे अजिंक्य घुले याच्याबरोबर प्रेमसंबंध असून तो गावात बदनामी करतो.
त्याला जाब विचारल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन पुण्यास राहण्यास आलो असे त्याने फिर्यादीला सांगितले होते. पुण्यात तो स्विग्गीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो पुण्यात आल्यावर अजिंक्यही पुण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता तो घरी आला. तेव्हा त्याची पत्नी व अजिंक्य हे एकाच रुममध्ये होते.
त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. अजिंक्य घुले याने त्याला मारहाण करुन तुझ्या बायकोबरोबर माझे संबंध राहणार. तुला काय करायचे ते कर.एक दिवस तुझा काटा काढून तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी जीवे मारण्याची धमकी त्याने गणेशला दिली.ही घटना फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी अजिंक्य घुले याला फोन करुन विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीचीउत्तरे दिली. फिर्यादी या पुण्यात आल्या. गणेश याच्या पत्नीला घेऊन फिर्यादी मुंबईला गेल्या.
दुसर्या दिवशी त्यांनी गणेश याला फोन केला असता तो उचलत नव्हता.त्यानंतर १९ सप्टेबर रोजी त्यांनी पुण्यातील एकाला गणेश फोन उचलत नसल्याचे सांगितले.तेव्हा तो गणेशच्या रुमवर गेला. गणेश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्यानंतर त्यांनी अंत्यविधी केल्यानंतर गुरुवारी फिर्याद दिली.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…