ताज्याघडामोडी

रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच लांबवली जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन

महामार्गावर दुचाकी-चारचाकीमध्ये धडक झाल्यानंतर जखमीला रुग्णवाहिकेत हलवत असतानाच रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन लांबवली.

धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली. राजीव मोतीराम सुरवाडे (44, सात नंबर पोलिस चौकीमागे, नालंदा नगर भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी स्वीप्ट (एम.एच.19 बी.यु.1766) वरील अनोळखी चालकाविरोधात अपघात केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान मार्बलसमोर दुचाकी-चारचाकीत अपघात झाल्याने त्यातील जखमीला उपचारार्थ हलवण्यासाठी रुग्णवाहिका मागवण्यात आली मात्र तक्रारदार अमित सतीशकुमार देसाई (33, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या भावाच्या गळ्यातील 33 ग्रॅम वजनाची व एक लाख 68 हजार 817 रुपये किंम1तीची सोन्याची चेन खाली पडल्यानंतर ती रुग्णवाहिकेतील पॅरामेडिकल स्टाफ राजीव मोतीराम सुरवाडे (44, सात नंबर पोलिस चौकीमागे, नालंदा नगर भुसावळ) यांनी खिश्यात टाकली. 

जखमी रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना चेन गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर चौकशीअंती सुरवाडे यांनी चैन लांबवल्याचे उघड झाल्यानंतर बुधवारी सकाळी 6.11 वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राजीव सुरवाडे यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago