पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणाने हत्या, अपहरण अशा घटना घडत असतात. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातील निगडी येथील गंगानगर येथे घडला आहे. एका तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिला पकडत तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तिच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारु ओतून तिच्या हातावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
या धक्कादायक घटनेबाबत पिडीत तरुणीच्या ३२ वर्षीय बहिणीने काल निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन मारुती घाडगे (वय ३१, रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव) याच्यासह तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतन घाडगे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण म्हणजेच पिडीत २७ वर्षीय तरुणी काल गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदीरातून देर्शन घेऊन परत येत होती.
रस्त्यावर असणाऱ्या कणीस विक्रेत्याकडून पिडीत तरुणी कणीस घेत होती. त्याचवेळी आरोपी चेतन घाडगे आणि तीन साथीदार तिथे आले. तरुणीला पाहून “काढ रे काढ कोयता, हिच्यावर वार कर”, असा दम त्यांनी भरला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तेथून पळ काढला. तरुणी रस्त्याने पळत असताना आरोपींनी तिचा पाठलाग केला. त्यामुळे तरुणी गुरुदेवनगर येथील एका सार्वजनीक शौचालयात जाऊन लपली.
आरोपीही तिच्या मागे पळत या शौचालयात गेले. आरोपींनी तरुणीला पकडत अंगावर आणि गुप्तांगावर दारू ओतली. मिरची पावडर खाऊ घातली. डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर तिच्या हातावर ब्लेडने वार करत जखमी करत सर्व कपडे फाडून आरोपी तेथून फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे पुढील तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…