ताज्याघडामोडी

ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

मोबाइल चार्जिंगच्या नादात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडल्याने ओला चालकाच्या रिक्षाचालक मित्राने ५० मीटरपर्यंत वाहनांसह पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये बुधवारी घडली.

या घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी चालक राजू रामविलास यादव (४२) याला अटक केली आहे.

पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्वेकडील पुष्पविहार जंक्शन येथे बुधवारी दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडली. घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी असलेला राजू यादव रिक्षाचालक आहे. तो ओला चालक मित्राच्या टूरिस्ट कारमध्ये मोबाइल चार्जिंग करण्यासाठी बसला. त्याने चार्जिंगसाठी गिअरमधील गाडी सुरू केली.

गाडी सुरू होताच गोंधळलेल्या राजूने गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबला. त्यामुळे गाडी आणखी वेगात पुढे गेली. वेगात असलेल्या गाडीने एक कार, तीन रिक्षा यांना धडक दिली. तसेच काही पादचाऱ्यांनाही उटवले. ५० मीटरपर्यंत गाडी पुढे गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजेंद्रप्रसाद बिंदवय (४९), सपना रवींद्र सनगरे (३५), आदित्य सनगरे (९), वैष्णवी काळे (१६), जयराम यादव (४६), श्रद्धा सुशविरकर (१७), भरतभाई शहा (६५) जखमी झाले आहेत. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पंतनगर पोलिसांनी यादवला अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago