चॉकलेटचे आमिष दाखवून एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 60 वर्षाच्या वृद्धाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि.20) दीडच्या सुमारास दापोडी येथे घडली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-24) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम कादर खान (वय-60 रा. दापोडी) याच्यावर आयपीसी 376, 376(3), 376(2) (एन), 376 (ए,बी), 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहण्यास आहेत.मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी
घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.मुलीच्या आईने भोसरी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक मनिषा दशवंत करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…