जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे .
मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अफसाना उर्फ तारा सुलेमानी असं या निर्दयी आईच नाव असून घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर जव्हार पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे . पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील साना सुलेमान या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घराशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला.
यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतर सानाची आई अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिला जव्हार पोलिसांनी 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे . सानाची आई इतरांच्या घरात घरकाम करत करून उदरनिर्वाह करायची. ती आपल्या पतीपासून विभक्त होऊन मागील दोन वर्षापासून तीन मुलांसह जव्हार येथे राहत होती.
मात्र तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या घरात नेहमीच पैशांवरून वाद होत होते. याच आर्थिक कणकणीला कंटाळून आरोपी आईने तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केल्याचा अंदाज पालघर पोलिसांनी वर्तवला आहे .
या प्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी आईची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे . मात्र, हत्येचं खरं कारण काय होतं हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे .
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…