पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका नामांकित सोसायटीत जेवणाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत, डिलिव्हरी बॉयने तिचे जबरदस्तीनं चुंबन घेतलं आहे. तरुणीने तत्काळ याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.
रईस शेख (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय याचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने झोमॅटो अॅप करून तिने जेवण मागवले होते. जेवणाचं पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडे नऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता.
जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढले आणि तिच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…