वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तयार करुन तिच्याच वाढदिवसा दिवशी व्हायरल केला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्वी शहरातील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून एका मुलीचा अश्लिल व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करुन तिच्या वाढदिवशीच सोशल मीडियावर व्हायरल करुन मुलीची बदनामी करुन विनयभंग केला. प्रकरणाची तक्रार अमरावती येथील गाडगेनगर पोलिसात दाखल झाली आहे. मात्र, घटनास्थळ आर्वी शहरातील असल्याने हे प्रकरण आर्वी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.
अमरावती येथील अल्पवयीन मुलगी आर्वीत शिक्षणासाठी असताना सप्टेंबर २०२० मध्ये तिची ओळख गौरव घोडेस्वार नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला आर्वी येथील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून स्वत:च्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ चित्रित केले. यावेळी मुलीने त्याला नकार दिला.
१ सप्टेंबर २०२२ रोजी मुलीचा वाढदिवस असल्याने ती तिच्या कुटुंबियासोबत अमरावती येथील घरी असताना तिच्या चुलत भावाने मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर वर्षभरापूर्वी गौरवने काढलेला दिसला. तो व्हिडिओ आरोपी गौरव याने स्वत:च्या स्टेटसवर ठेवला होता. यामुळे मुलीची बदनामी झाली. अखेर मुलीने थेट अमरावती येथील गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली.
अमरावती जिल्ह्याच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत आर्वी पोलिसांकडे वर्ग केले. आर्वी पोलिसांनी याप्रकरणात आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती आर्वी पोलिसांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…