राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातही हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भाऊ हा संकटात मदत करणारा असतो. मात्र, पुण्यात एका भावाने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला.
हत्येची ही घटना कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील माउली निवास येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तेजस यशवंत भोसले, असे 25 वर्षीय मृताचे नाव आहे. याबाबत आई सुनीता यशवंत भोसले (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी आकाश यशवंत भोसले (वय 29, रा. टिळेकरनगर कोंढवा) याला अटक केली आहे.
आकाश आणि तेजस हे दोघे सख्खे भाऊ होते. यातील तेजस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याला दारूचेही व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो घरातल्या लोकांना शिवीगाळ करत असे. त्याच्या अशा वागण्यामुळे आकाश हा त्याच्यापासून दुसरीकडे वेगळा राहत होता.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला होता. यानंतर तो घरातील लोकांना शिवीगाळ करून मारहाण करू लागला होता. यामुळे त्याच्या आईने ही माहिती आकाशला दिली. यानंतर आकाश तेथे आला होता आणि यावेळी दोघांत वाद झाला. तसेच आकाशने तेजसला मारहाण करून रागाच्या भरात त्याचा गळा दाबून ढकलून दिले. त्यांना वाटले दारू पिल्यामुळे तो पडला आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…