ताज्याघडामोडी

पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा 500 किमी ट्रेनने प्रवास

औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने मृत पत्नीसोबत 500 किलोमीटरचा ट्रेनने प्रवास केल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे या घटनेची सहप्रवाशांना देखील कल्पना नव्हती.पतीला सुद्धा पत्नीची मृत्यू झाल्याची माहिती नव्हती. मात्र नंतर ट्रेनमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर या घटनेचा उलगडा झाला. 

पती आपल्या आजारी पत्नीला घेऊन लुधियानाला उपचारासाठी जात होता. यावेळी ट्रेनमध्ये काही अंतरावर पोहोचताच तिची तबीयत आणखीणच खालावली होती. या दरम्यानचं तिने पतीच्या मांडीवरच प्राण सोडला होता. मात्र याची पतीसह सहप्रवाशांना कल्पनाच नव्हती. पतीला ती झोपली असल्याचे वाटल्याने त्याने तिच्यावर चादर ओढली होती. असा साधारण त्याने 500 किमी अंतर पार केले होते. 

टीसी चढला ट्रेनमध्ये 

प्रवासादरम्यान गाडी महत्त्वाच्या स्थानकात पोहोचताच टीसीने ट्रेनमध्ये प्रवेश केला होता. यावेळी टीसीने सर्व प्रवाशांची तिकीट तपासण्यास सुरुवात केली. तिकीट चेक करता करता टीसी त्या पतीजवळ पोहोचला होता. टीसीने पतीला तिकीट विचारले व पतीला उठवण्यास सांगितले. यावेळेस पतीला जाग करताना त्याला पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago