ताज्याघडामोडी

लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी बेतली मोठ्या भावाच्या जीवावर; छातीत कोपरखळी मारून खून

लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मोठ्या भावाच्या छातीत जोराने कोपरखळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेकडील सेंट्रल हॉस्पिटलनजीक असलेल्या ज्यूस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुष्कर नितीन धुळे (वय २९) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शुभम विश्वास मोरे (वय २६) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. 

मृतक शुभमचा मुजिशिअन असलेल्या लहान भाऊ शिवम (वय २२) याचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने शिवम हा त्याच्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करून कात्रप रोडने घराच्या दिशेने दुचाकीवरून येत होता. त्यावेळी वाटेतच बदलापूर पूर्वेकडील सेंट्रल हाँस्पिटलनजीक असलेल्या आरोपी पुष्करच्या ज्यूस सेंटरमध्ये त्याचा मित्र विशाल हा आरोपीशी बोलत असताना विशालला आवाज देऊन बूम केले.

यामुळे आरोपी पुष्करला राग येऊन शिवमला शिवीगाळ करून त्याला मारण्यासाठी धावला. त्यावेळी दोघामध्ये जोरदार भांडण झाले. त्याचवेळी लहान भावाचे भांडण पाहून मोठा भाऊ भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता, आरोपी पुष्करने त्याला जबर मारहाण करून त्याच्या डाव्या बाजूच्या छातीत जोरदार कोपरखळी मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गंभीर अवस्थेत शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago