मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलीसभरतीची तयारी करणाऱ्या दोन युवकांचे हात कापल्या गेल्याची घटना घडली आहे.
माहितीनुसार, मलकापूर आगाराची बस (क्र.एम.एच.40 एन 9121)बस पिंपळगाव देवी जात होती. दरम्यान या बसच्या बाजूचा पत्रा बाहेर निघालेला होता. दरम्यान पिंपळगाव देवी रोडवर सकाळी मॉर्निग वॉक करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या हाताला या भरधाव बसचा पत्रा लागल्याने यात दोन्ही तरुणांनांचे हात शरीरापासून वेगळे झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली असून सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हात कापलेल्या तरुणांनाच नाव विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे आहे. हे तरुण पोलीस भरतीची तयारी करत असून नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते. पुढे आलेल्या माहितीनुसार, या बसचा पत्रा आधीच तुटलेला होता आणि तो बसच्या बाहेर निघाला होता. सकाळी बस मलकापूर आगारातून निघाल्यावर पिंपळगाव देवी रोडवर मॉर्निंगवॉकला निघालेल्या या दोन युवकांना बसचा धक्का लागला आणि यात दोघांचेही हात धडावेगळे झाले. दोन्ही तरुणांना तात्काळ मलकापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान बसच्या चालकाला धामणगाव बढे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत कळताच वागरिकांनी मलकापूर डेपोमध्ये तोडफोड केली असून येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…