मालाड येथे लिफ्ट दुर्घटनेत शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. जिनल फर्नांडिस असे तिचे नाव आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
जिनल या वसई येथे राहत होत्या.तीन महिन्यांपासून त्या मालाड येथील एका शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत आल्या. दुपारी त्या सहाव्या मजल्यावर शिकवण्यासाठी गेल्या होत्या. ब्रेक झाल्यावर त्या सहाव्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावरील दुसऱया वर्गात जात होत्या.
सहाव्या मजल्यावरून त्या लिफ्टमधून खाली जात होत्या. त्याचा एक पाय लिफ्टबाहेर होता. अचानक लिफ्ट वर गेली. त्यामुळे जिनल या लिफ्टच्या बाजूला असलेल्या भागात अडकल्या.
हा प्रकार चौथ्या मजल्यावर शिकवत असलेल्या एका शिक्षिकेच्या लक्षात आला. तिने याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली. अपघातात जखमी झालेल्या जिनलला मालाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच मालाड पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा करून जिनलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…