राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या वतीने 1 उपाध्यक्ष, 6 राष्ट्रीय सरचिटणीस 5 राष्ट्रीय सचिव, 6 प्रवत्ते, 12 कार्यकारिणी सदस्य, 21 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचे प्रदेशाध्यक्ष, 9 राज्य प्रभारी, 5 निरीक्षक आणि आघाडय़ावरील संघटनांचे 4 प्रतिनिधी अशा नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे.
तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची निवड केली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी दिली आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचीही जबाबदारी दिली असून फौजिया खान यांच्यावर पक्षाच्या महिला काँग्रेसची धुरा दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या जागी त्यांची कन्या डॉ. सीमा मलिक यांना प्रवत्तेपद, राष्ट्रीय चिटणीसपद दिले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…