पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
सव्वीस वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा छळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. काळे कपडे घातल्याने तुला मुल होणार नाही, अनैसर्गिक कृत्य करणे, विरोध केल्यास मारहाण करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रतीक शरद गिरमे (वय ३०), सासरे शरद कृष्णाजी गिरमे (वय ७१), सासू सुरेखा शरद गिरमे (वय ६५), दीर पंकज शरद गिरमे (वय ३२) आणि जाऊ निखिता पंकज गिरमे (वय २९, सर्व रा. मॉर्निंग ड्यू सोसायटी, शेवाळवाडी रस्ता, मांजरी बुद्रुक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक गिरमे आणि त्याची पत्नी उच्चशिक्षित आहे. प्रतीक आणि त्याचे आई, वडील, भाऊ, वाहिनी एका धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत. त्यामुळे ते सतत त्यांच्या सुनेला अंधश्रद्धेच्या नावाखाली त्रास देत होते. ‘काळे कपडे घालू नये, काळे कपडे घातल्यास मूल होत नाही, माताजींनी दिलेले कुंकू लावण्यास भाग पाडणे, कुंकू पुसलेले दिसल्यास शिवीगाळ करून मानसिक त्रास देणे,’ असा प्रकार सुरू होता; तसेच विवाह झाल्यापासून पती पीडितेवर पॉर्न व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक कृत्य करीत होता. सहकार्य न केल्यास मारहाण करीत होता. पीडिता र्भवती असताना किरकोळ कारणावरून पतीने लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. यामुळे गर्भपात करावा लागला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…