ताज्याघडामोडी

डबल मर्डर,अर्धी दाढी झाल्यावर दाढीच्या पैशावरून वाद

सलून मालकाने केली ग्राहकाची हत्या

जमावाने केली सलून दुकानदाराची हत्या 

अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणून तगादा लावल्याने, झालेल्या वादात सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा कापून खून केला. तर या घटनेमुळे संतप्त झालेल्या  अज्ञात जमावाने सलूनच्या मालकाचा ठेचून खून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील किनवट येथे घडली आहे.

  बोधडी येथील बाजारपेठेत बुधवारी (दि.15 ) सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोधडी येथे अनिल मारुती शिंदे वय अंदाजे चाळीस वर्षे या नाभिक समाजाच्या तरुणाचे सलूनचे दुकान मार्केटमध्ये आहे. या सलूनमध्ये सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास याच गावात राहणारा व्यंकटी सुरेश देवकर (22 वर्षे) हा तरुण दाढी करण्यासाठी गेला. दाढी करत असताना अर्धी झाल्यावर देवकरला शिंदेने दाढीचे पैसे दे म्हणून मागणी केली. माझी दाढी पूर्ण कर दाढी झाल्यावर पैसे देतो, असे सांगितल्याने दोघात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि चक्क अनिलने व्यंकटचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच देवकरच्या नातेवाईकांनी जमाव करून प्रथम सलूनचे दुकान जाळून टाकले व नंतर त्याचा शोध घेऊन त्याला गावाच्या भर मार्केटमध्ये ठेचून मारून खून केला. नंतर त्याचे घर ही जाळून टाकले. ही माहिती प्राप्त होताच किनवट पोलीस घटनास्थळी रवाना झाले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago