पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानेच सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
संतोष वाघ याने आपला मित्र रामचंद्र दहिवाळ याच्यासह सराफा व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवले. त्यानंतर वाघ याने पोलीस असल्याचे सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने तब्बल २४ तोळे सोनं आणि ८ लाख ४० हजार रुपये रोख सराफा व्यापाऱ्याकडून लुटले. अशोक विसपुते असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. सराफा व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली.
सराफा व्यापारी अशोक विसपुते यांनी या घटनेनंतर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेला संतोष वाघ विरोधात २४ तोळे सोने, ८ लाख ४० हजार रोख रक्कम चोरली याप्रकरणी गुन्हा दाखल असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना तब्यात घेतले आहे.
लुटण्याच्या या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली गाडी जप्त केली असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…