फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाचे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२ आयोजित करण्यात आले होते. एनसीईआरटी नवी दिल्ली भारत सरकार अन्वये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी किंवा टेक्नॉलॉजी खेळणी असा निश्चित केला असून पर्यावरणाला अनुकूल व सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान दिंडीच्या पूजनाने झाली या दिंडीमध्ये विविध शास्त्रज्ञांचे फोटो व विज्ञान पुस्तके होती तसेच विज्ञान विषयाची माहिती शास्त्रज्ञांची माहितीचे चार्ट विद्यार्थ्यांनी घेतले होते. या दिंडीमध्ये पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर लेझीम सादर केली, यानंतर या कार्यक्रमाचे सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने व सरस्वती पूजनाने झाली, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी श्री महारुद्र नाळे ,शिक्षण विस्ताराधिकारी श्री.एल.पी कुमठेकर ,फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, एओ वर्षा कोळेकर सांगोला तालुक्यातील केंद्र शाळांचे केंद्रप्रमुख हे पाहुणे या विज्ञान प्रदर्शनाला लाभले या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातून एकूण ८७ शाळांनी विविध प्रयोग घेऊन सहभाग नोंदवला . या प्रदर्शनामध्ये सॉफ्टवेअर आणि ॲप्स ,वाहतूक परिवहन व पर्यावरण, हवामान बदल आरोग्य व स्वच्छता इको फ्रेंडली विज्ञान गणितीय मॉडेल इत्यादी विषयाचे प्रयोग सादर करण्यात आले . फॅबटेक पब्लिक स्कूलचे श्री निसार इनामदार, फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचे डॉ. निकते सर, न्यू इंग्लिश स्कूलच्या सौ गुळमिरे मॅडम ,कन्या प्रशाला सांगोलाचे श्री शिंदे सर यांनी या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून परिक्षण केले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी गटामध्ये प्रथम क्रमांक कु. श्रेयश गाडेकर न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, द्वितीय क्रमांक कु.आर्यन पवार विद्यामंदिर प्रशाला सांगोला व तृतीय क्रमांक कु.सचिन गुळमिरे फॅबटेक पब्लिक स्कूल, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर इयत्ता नववी ते बारावी मध्ये प्रथम क्रमांक कु.संस्कार पवार न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, द्वितीय क्रमांक कु स्वप्नदीप जगधने जवाहर विद्यालय घेरडी, तृतीय क्रमांक कु.सुमित माने न्यू इंग्लिश स्कूल सांगोला ,शिक्षक मोठा गट प्रथम क्रमांक श्री.सोमनाथ सपाटे नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा, द्वितीय क्रमांक श्री एम .एस .काझी हलदहिवडी विद्यालय हलदहिवडी लहान गट शिक्षक मध्ये प्रथम क्रमांक सौ. वैशाली मिसाळ/भोसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाडगे मळा, द्वितीय क्रमांक श्री. सिद्धनाथ मिसाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झापाचीवाडी या स्पर्धक शिक्षकांनी यश मिळवले. प्रदर्शनाच्या शेवटी गटशिक्षणाधिकारी श्री महारुद्र नाळे व शिक्षण विस्तार अधिकारी श्री.एल पी कुमठेकर फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील व तालुक्यातील केंद्रप्रमुख यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांचेही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश देवमारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, एओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर यांचे विशेष सहकार्य लाभले .तसेच हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…