ताज्याघडामोडी

किर्तनकाराच्या आत्महत्येस कारणीभूत, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

युवा कीर्तनकार संजय मोरे यांनी १० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी मयत संजय मोरे यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार  इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महादेव जाधव आणि त्यांच्या एका अनोळखी मित्र अशा इसमांविरोधात  इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

8 सप्टेंबर रोजी आरोपी पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि सहआरोपीने एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस ? असे म्हणत घरी जाऊन मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली होती. त्यांनंतर १० सप्टेंबर रोजी  संजय मोरेंनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आरोपी हे मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संजय मोरे यांच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.आरोपी हे मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संजय मोरे यांच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.घटनेपूर्वी दिवस मयत संजय मोरे यास आरोपींची तापी बिल्डींग व देशपांडे व्हेज मध्ये नेवून मारहाण केली होती अशीही माहिती मयताने घटनेच्या आदल्या दिवशी बहिणीस व लहान भावास दिली होती असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago