ताज्याघडामोडी

टोलनाक्यावर दोन महिलांमध्ये जोरदार राडा

सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ इतके शेअर केले जातात की तो आकडा पाहूनही आपण थक्क होतो. तर, काही व्हिडीओ वारंवार पाहिले जातात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली हाणामारी पाहायला मिळत आहे.ही महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली नाशिकमधील एका टोलनाक्यावर.  नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिला आपापसात भिडल्या आणि आजुबाजूचे पाहतच राहिले. नेमकं काय चाललंय हेच अनेकांना कळेना.

टोल भरण्याच्या कारणावरून आधी वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. वाद इतका पेटेल याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. पण, नेमकं तेच झालं, प्रवासी महिला आणि टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी झाली. यावेळी त्या दोघीही एकमेकींना पूर्ण ताकदीनं मारत असल्याचं लक्षात आलं. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago