ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी खंजीर खुपसला- श्रीकांत शिंदे

सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभारणार

पंढरपूर – महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन या कंपनीचा सेमीकंडक्टर डिस्प्ले फॅब्रिकेशनचा होणारा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे या प्रकल्पातून महाराष्ट्रामध्ये 1 लाख 60 कोटींची गुंतवणूक व सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण महाराष्ट्रातल्या तरुणांसोबत गद्दारी करून गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प गुजरातला स्वाधीन करत आहात मग आपण महाराष्ट्राचे हित न पाहता गुजरातचे हित जर पाहत असाल तर महाराष्ट्रातला तरुण हा कधीही सहन करणार नाही जर तुम्ही महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातांना जर रोजगार उपलब्ध करून देत नसाल तर त्या हातांना आपल्या विरोधात दगड घेण्याची वेळ येऊ देऊ नये यासाठी आपण शिंदे सरकारविरोधात आक्रमक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केलेले आहे.
विशेष म्हणजे वेदांता व फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटी रूपयांची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटी रूपयांची सवलत दिली तरीही हा प्रकल्प जाणीवपुर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला याच्यामागे कोणाचे कारस्थान आहे हे तरूणांनी ओळखावे व त्यांना त्यांची जागा दाखवावी.
वेदांता ग्रुप व फॉक्सकॉनचा हा प्रकल्प जर गुजरातला जात असेल तर महाराष्ट्रातल्या तोंडातला घास आपण गुजरातला देत आहात असेच म्हणावे लागेल जो प्रकल्प महाराष्ट्रात उभा होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 95 % तरतुदी पूर्ण केल्या असताना ही जर हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असेल तर आधी महाराष्ट्रातील तरुणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माफी मागितली पाहिजे. ज्या तरुणांना आपण रोजगार देऊ शकत नाही. हिंदुत्वाच्या नावावर आपण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याच पद्धतीने हा महाराष्ट्रात उभा राहणारा प्रकल्प जर गुजरातला जात असेल तर ज्या 1 लाख ते दीड लाख तरुणांना रोजगार मिळणार होता त्या तरुणांच्या पाठीत खऱ्या अर्थाने खंजीर खूपसण्याचे काम एकनाथ शिंदे साहेब आपण करत आहात असेच म्हणावं लागेल आणि ह्या घटनेचा मी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने मी आपला जाहीर निषेध करतो व महाविकास आघाडी सरकारमधील युवक कॉंग्रेस आय व शिवसेनेचे युवा सेना यांना विनंती करतो की या सरकारच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलने करून महाराष्ट्रात उभा राहणारा प्रकल्प हा महाराष्ट्रातच उभा राहिला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात लढा उभा करणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

शिंदे सरकारविरोधात मविआ आक्रमक आंदोलन उभारणार
सदरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात जाण्याच्या निषेधार्थ शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यासाठी लढा उभारणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago