एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीने, आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवा परिसरातून समोर आला आहे. प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर कधी धमकावून, तर कधी देवीचा कोप होईल, अशी भीती दाखवून हे घृणास्पद कृत्य त्याने केले. वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अंधेरीच्या म्हाडा कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेला सुरेशकुमार हा एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे. आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून एका कुटुंबाशी त्याने जवळीक केली. या कुटुंबातील मुलीला ऑक्टोबर, २०१९मध्ये आपल्या घरी बोलावून तिला प्रसाद खायला दिला. प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे मोबाइलने चित्रीकरण केले. त्यावेळी ही मुलगी अल्पवयीन होती. त्यानंतर मोबाइलमधील चित्रीकरणाच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करून अंधेरी आणि कुर्ला येथील निवासस्थानी नेऊन तो लैंगिक अत्याचार करू लागला.
मुलीने नकार देताच सुरेशकुमारने तिला न पाठविल्यास कुटुंबावर देवीचा कोप होईल, अशी भीती दाखवून तिच्याकडून पूजा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दैवी शक्तीच्या बहाण्याने सुरेशकुमार गेली चार वर्षे अत्याचार करीत होता. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीने हा प्रकार घरी सांगितला. तसेच याबाबत तक्रार करण्यासाठी तिने पुढाकार घेतला. कुटुंबानेही सुरेशकुमार याच्या विरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी सुरेशकुमार याच्या विरोधात बलात्कार, धमकी तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सुरेशकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…