लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाच्याने रागाच्या भरात आपल्या मामाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. एकनाथ बंडू जाधव असे या मारेकऱ्याचे नाव आहे. एकनाथ जाधव याने आपल्या मामाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. पण मामाने ‘तू काही काम करत नाहीस’, असे सांगत भाच्याला मुलीगी देण्यास नकार दिला. त्यामुळे मामाच्या मुलीशी लग्न करण्याचे एकनाथचे स्वप्न भंगले. त्यामुळे रागाच्या भरात एकनाथ जाधव याने आपल्या मामाचा काटा काढला. याप्रकरणी मनाठा पोलिसांनी भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे शुक्रवारी रात्री घराबाहेर झोपलेले बालाजी दिगंबर काकडे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी खबऱ्यांमार्फत पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली.
माहितीच्याआधारे पोलिसांनी बालाजी काकडे यांचा भाचा एकनाथ बंडू जाधवला अटक केली. चौकशीदरम्यान त्याला पोलिसी खाक्या दाखवताच या खून प्रकरणाचा उलगडा झाला. चाभरा येथील बालाजी काकडे यांच्याकडे भाचा एकनाथ बंडू जाधव याने मुलीचा हात मागितला होता. यावेळी ‘तू काही काम करत नाहीस’, असे म्हणत मामाने एकनाथला मुलगी देण्यास नकार दिला. मामा मुलगी देत नसल्याचा राग मनात ठेवून भाच्याने मामालाच संपविले. सदर खून प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आदींनी तपास घेऊन भाचा एकनाथ बंडू जाधव (वय १९) वर्ष यास अटक केली. पोलिसांनी खाकीचा हात दाखवताच एकनाथ याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. ५० तासांनी आरोपीस मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…