बारामती पेशंटला तपासणीसाठी घरातून लवकर बाहेर न आल्यावरून डॉक्टर सह कुटुंबीयांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली. याप्रकरणी युवराज शिवाजी गायकवाड, डॉक्टर रा. सांगवी, ता बारामती यांनी फिर्याद दिली आहे.
आनंदा संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप, अशोक शंकर जगताप, सर्व राहणार सांगवी ता. बारामती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. सदर घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी डॉक्टर यांचा दवाखाना व घर बारामती तालुक्यातील सांगवी येथे आहे. डॉक्टर युवराज गायकवाड हे ओपीडी संपवून रात्री 9:30 वाजता घरात जेवण करत होते.
दरम्यान डॉक्टर रुग्णाला तपासणीसाठी लवकर येत नसल्याने वरील आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून डॉक्टरांच्या घरी जात घराचा दरवाजा वाजवून खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. सदर प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात वरील आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार संजय मोहिते करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…