ताज्याघडामोडी

धक्कादायक घटना; बापाकडूनच तरुण मुलीचे लैंगिक शोषण

राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत.

आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – ही संतापजनक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत उघडकीस आली आहे.

या प्रकरणी नराधम पित्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याचे वय 51 इतके आहे. तर पीडित तरुणीचे वय 19 आहे. मिळाळेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते.

त्यावेळी आरोपी नराधम पित्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका करून घेतली. तिथून सुटका केल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली.

तसेच घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. अखेर चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी नराधम पित्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago