घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली.या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे.
सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडाचे नाव आहे. दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश केला. काहीतरी चावल्याचा भास झाल्याने जाग आली. पाहिले असता साप चावल्याचे लक्षात आले. यानंतर दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते.
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्री मृत्यू झाला. तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा देखील आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…