एका वकिलाने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित तयार केली. तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार देऊन विश्वासघात केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी वकिलावर गुन्हा नोंदविला आहे. रियाज ताज मोहम्मद शेख (४३) रा. गणेशपेठ असे आरोपीचे नाव आहे.
रियाज शेख हा स्वत:ला वकील असल्याचे सांगतो. त्याचे लकी रेस्टॉरेंट नावाने हॉटेल आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रियाजची पीडित ३८ वर्षीय महिलेशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने महिलेला लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्नाचे आमिष दाखवून रियाजने महिलेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तो महिलेशी अनैसर्गिक कृत्यही करीत होता. त्याने महिलेचे अश्लील छायाचित्र काढले होते. ते छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करीत होता. त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने थेट नकार दिला. अश्लील चित्रफित प्रसारित करून बदनामीची धमकी दिली. महिलेने गिट्टीखदान पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून रियाजला अटक केली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…