पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे.
या प्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. घटनेला वेगळं वळण मिळावं, म्हणून आरोपींनी अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाच्या कुटुंबियांना 20 कोटींची खंडणी मागितली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी कौटुंबिक कारण पुढे करत मूळ कारण सांगण्यास नकार दिला आहे. सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गुरुवारी या 7 वर्षीय मुलाच राहत्या सोसायटीच्या पार्किंग मधून अपहरण झालं होतं. याबाबत खून झालेल्या मुलाच्या वडिलांनी पिंपरी पोलिसात अपहरणाची तक्रार दिली. पिंपरी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकासह शेकडो पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, आरोपी मंथनच 7 वर्षीय मुलाच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे पुढे आलं आहे. तसेच दोन्ही कुटुंबात वाद झाले होते.
याच रागातून आरोपी मंथनने मित्र अनिकेतच्या मदतीने 7 वर्षीय मुलगा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून अपहरण केलं तिथंच त्याच नाक आणि तोंड दाबून खून केला आहे. या अपहरणाचा कट गेल्या 10 दिवसांपासून रचला गेला होता. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह भोसरी MIDC परिसरातील पडक्या इमातीवरील टेरिसवर नेहून ठेवला.
दरम्यान, आरोपी मंथनच पोलिसांसह आरोपीचा शोध घेत होता. त्यांच्या तपासात तो अडथळे आणत होता. अखेर त्याला पकडण्यात यश आले आणि साथीदारासह मंथनला अटक करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून त्याने खून केल्याची कबुली दिली, असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…