ताज्याघडामोडी

बहिणीला नांदवत का नाही विचारले; संतापलेल्या भावोजीने मेव्हण्यालाच संपवले

तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या रात्री घडलेल्या हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडाली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या कारणावरून वाद झाला आणि भावोजीचा पारा चढला. भावोजीने मागेपुढे न पाहता मेहुण्या ला थेट संपवून टाकला. या हत्ये मुळे कराडसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस तातडीने घटनास्थळास्थळी दाखल झाले. त्यांनी फरार आरोपीला अवघ्या अडीच तासांत शोधून ताब्यात घेतले आहे. सचिन वसंत मंडले असे हत्या झालेल्या 35 वर्षीय मेहुण्याचे नाव आहे.

किरकोळ भांडणाचे पर्यावसन हत्येत

अनंत चतुर्दशीच्या रात्री सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह होता. याचदरम्यान उंडाळे गावातील माळी वस्ती येथे आरोपी भावोजी व त्याच्या मेहुण्यामध्ये बहिणीला का नांदवत नाही म्हणून भांडण झाले. त्या भांडणाचे पर्यावसन अखेर हत्येमध्ये झाले.संतापलेल्या भावोजीने धारदार शस्त्राचा वापर करून मेहुण्याचा खून केला. रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अवधूत हणमंत मदने असे 42 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

उंडाळे गावाजवळ घडली घटना

उंडाळे गावच्या पश्चिमेस कराड-रत्नागिरी रोडच्या बाजूस माळी वस्ती हे गावात ही हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रेठरे खुर्द येथील मूळ रहिवाशी असलेला सचिन मंडले हा दूध व्यावसायाच्या निमित्ताने उंडाळे येथे भाड्याच्या घरात राहत होता. अवधूत मदने याने धारधार शस्त्राने सचिन मंडलेवर वार केले.त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago