ताज्याघडामोडी

मा.आ.परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त 42 कुटूंबांना घरासाठी पन्हाळी पत्र्याचे वाटप

संदिप माने यांचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पै.संदिप माने यांच्यावतीने पंढरपूर शहरातील 42 कुटूंबांना घरावरील पन्हाळी पत्र्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमाने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे घेण्यात आला. यावेळी प्रत्येक कुटूंबाला 5 पत्रे देण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर (देशमुख), भाजप अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष लक्ष्मणतात्या धनवडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट,  भाजप सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, जिल्हा सरचिटणीस बादलसिंह ठाकूर, किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, प्रा.सुभाष मस्के सर,  शहर संघटक धिरज म्हमाणे, बाबा ग्रुपचे संस्थापक बाबा चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा.आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, समाजातील गरजू लोकांना ऊन,वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे या हेतूने संदिप माने यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून पन्हाळी पत्रे वाटप करून त्यांच्या घराचे संरक्षण होईल अशी काळजी घेतली आहे ही निश्चितच चांगली बाब आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून जो जे वांच्छिल तो ते लाहो याप्रमाणे  आपण समाजाच्या मदतीला जाण्याविषयी सांगितले त्याचप्रमाणे आज संदिप माने यांनी कार्य केलेले आहे. निवडणूक ही केवळ एक दिवसाची असते उरलेले 364 दिवस हे समाजसेवेचे असतात हे लक्षात घेवून आपण भविष्यातही यापेक्षा आणखी मोठे कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी संदिप माने यांचा कार्याचा आढावा घेताना सामुदायिक विवाह सोहळा, कोरोना काळात 100 दिवस अन्नदान तसेच जनतेच्या प्रश्नासाठी  शासन दरबारी विविध आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे सांगत त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भैय्या अभंगराव, सुनिल अधटराव, मगरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे, आदित्य माने, पवन अधटराव, सचिन बाबा माने, पै.महेश आटकळे, अक्षय माने, चैतन्य अधटराव, दिपक होमकुंबरे, प्रशांत झेंडे, राहुल तावसकर, संजय नेहतराव आदि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे समस्त महादेव कोळी समाज संघ व समस्त जुनी पेठ तालीम, भाजपा सोलापूर जिल्हा यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago