सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना
उजनी धरणात आज दुपारी 1.00 वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08% इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. उजनी धरणातून भीमा आणि सीना नदीमध्ये विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
धरणाच्या उपयुक्त पाणी साठयामध्ये लवकरच मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये उजनी धरणाच्या सांडव्यावरून भिमा नदीमध्ये 50000 क्युसेक्सने विसर्ग चालू असून आज दुपारी 2.00 वाजता उजनी धरण सांडव्यावरून भिमा नदीमधील विसर्गामध्ये वाढ करून 60000 क्यूसेक्सने विसर्ग करणेत आलेला आहे. त्यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडवा 60000 क्यूसेक्स व विद्युत गृह 1600 क्यूसेक्स असा एकूण 61600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणा-या पाण्याच्या आवक नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य हानी टाळणेसाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी सिना व भिमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे. तसेच मोठया प्रमाणात सोडलेल्या विसर्गांमुळे नदी, नाले, ओढे यावर असलेल्या पुलावरील गार्ड स्टोनवरून पाणी वहात असल्यास कोणत्याही नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…