ताज्याघडामोडी

गुटखा दिला नाही म्हणून शेजाऱ्यावर चाकूने वार; हल्लेखोर फरार

शेजारच्या तरुणाने गुटखा खाण्यास मागितला. मात्र आपण गुटखा खात नाही. आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. अजय बलवीर बोथ ( वय, २२, रा. त्रिमूर्तीनगर) असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. तर स्वतंत्रसिंग आवदलाल सिंग ( वय ३०, रा. सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर) असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे.

जखमी स्वतंत्रसिंग त्रिमूर्तीनगरमध्ये कुटूंबासह राहून तो सुतारकाम करतो. त्यातच सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर स्वतंत्रसिंग हा आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होता. यावेळी तेथे त्याच्या शेजारी राहणारा आरोपी अजय बोथ समोर येऊन त्याने स्वतंत्रसिंग याला थांबवून तुझ्याजवळ गुटखा आहे ना, तो खाण्यासाठी दे, अशी मागणी केली.

मात्र सिंग याने आपण गुटका खात नाही. आपल्याजवळ गुटखा नाही. गुटक्यावर शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले. सिंग याच्या या बोलण्याचा अजयला राग आला.सिंग हा आपणाशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपणास देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने जवळील धारधार चाकूने सिंग याला काही कळण्याच्या आता रागाच्या भरात त्याच्यावर वार केले.

चाकू हल्ल्यात सिंग गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत आरोपी अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. जखमी अवस्थेत सिंग यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन फरार आरोपी अजयचा शोध सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago