पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात हत्या केली. तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. आईने मारहाण करुन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव आरोपी मुलाने रचला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात आईची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या. ही घटना कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत घडली आहे. रवी पुमणी ( वय ३४ ) असे आईची हत्येप्रकरणी अटक मुलाचे नाव आहे. तर सरोजा पुमणी असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे.
आरोपी रवी हा मृतक आई सोबत कल्याण पूर्वेतील हनुमाननगर भागात प्रभुकुंज सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहतो. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो नेहमीच मृत आई सरोजाकडे बाहेर मौजमजा करण्यासाठी पैशाचा तगादा लावत होता. मात्र सतत पैसे देणे शक्य नसल्याने मृतक आई सरोजाने त्याला नकार देत होती. त्यातच ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मृत आई सरोजा व आरोपी मुलगा दोघे जण घरात होते. त्यावेळी त्यांच्यात घरगुती वाद होऊन त्याने पुन्हा पैशांच्या विषयावरुन वाद उकरून काढला. मात्र आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रवीने आईशी भांडण करत तिला बेदम मारहाण करून रागाच्या भरात त्याने आईला जमिनीवर पाडून तिच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीचा फास लावून तिची हत्या केली.
खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या करून त्याने तिला घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवले. त्यानंतर एका नातेवाईकाला कॉल करून आईने मला बेशुद्ध होईपर्यंत मारले. त्यानंतर तिने गळफास घेतलाच बनाव केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आरोपीने स्वतःलाच मारून गंभीर दुखापत केल्याने त्याच्यावर सुरवातीला संशय आला नाही. त्या दिवशी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत आईचा मृतदेह शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून जखमी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
आईच्या शवविच्छदेन अहवालात तिची हत्या झाल्याचे समोर येतच मुलाला काल ताब्यात घेऊन त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, या चौकशीत त्याने आपण आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…